Pune : डेंग्यूचे थैमान! 630 जणांना लागण; 3556 संशयित रूग्ण

एमपीसी न्यूज – पुण्यात डेंग्युच्या रोगाने थैमान घातले असून 630 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. 3 हजार 556 रुग्ण हे संशयित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 
गेल्या काही दिवसापासून शहरात जोराचा पाऊस झाला. यानंतर तीन ते चार दिवसापासून शहरात कडक उन पडत आहे. डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात नुकतीच अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अशामध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. डेंग्यूचा आजारसुद्धा वाढू शकतो. यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

शहरामध्ये डेेंग्युच्या डासांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. ताप, अंगदुखी अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात तपासणी करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महापालिकेने तत्काळ आरोग्य विभागाची बैठक घेतली आहे.
याविषयी संजीव वावरे म्हणाले, बहुतेक वेळा डेंग्युचे उत्पत्ती ठिकाणे ही घरातच आढळली जातात. नागरिकांनी घरामध्ये पाणी साठवू नये. घरामध्ये कोणाला ताप आल्यास त्याची तपासणी करावी. महापालिका प्रशासन ज्या ठिकाणी डेंग्युचा रुग्ण सापडेल त्या ठिकाणच्या 100 घरांची तपासणी करते. धूर फवारणी आणि औषध फवारणी करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.