Mumbai news: बुद्धिबळ ऑलिंपियाड संयुक्त विजेत्या भारतीय संघाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Deputy Chief Minister Ajit Pawar congratulates the Indian team that won the Chess Olympiad jointly.

एमपीसी न्यूज – बुद्धिबळ क्षेत्रात विश्वविजेता स्पर्धेनंतर मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑलिंपियाड स्पर्धेत रशियाच्या सोबतीनं संयुक्त विजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी या दिग्गजांचा सहभाग असलेल्या संघाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या विदिथ गुजराथीसारख्या तरुणानं करणं, त्याला दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहार सरीन यांच्या युवा टीमची साथ मिळणं, यातून संयुक्त विजेतेपदाचं हे ऐतिहासिक यश मिळाले आहे.

भारतीय संघानं मिळवलेल्या यशाचा महाराष्ट्राला आनंद, अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेत्या संघाचं कौतुक केलं आहे.

बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारताची गौरवशाली परंपरा युवा खेळाडू तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत. या विजेतेपदामुळे येणाऱ्या काळात अनेक युवक बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.