Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार करोना पॉजिटिव्ह !

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रस पार्टीचे नेते अजित पवार यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. गेल्या काही दिवसांपासुन ते होम क्वारंटाईन होते मात्र आता त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासुन त्यांच्या प्रकृतीबाबत बातम्या समोर येत होत्या. एवढच नव्हे तर सुरूवातीला त्यांनी घरीच विश्रांती घेत घरातून कामाचा धडाका लावला होता. आज मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

अजित पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी दिलेल्या संदेशात ते म्हणाले, “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून  प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III