मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट

एमपीसी न्यूज-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार महेश लांडगे यांच्या घरी आज संध्याकाळी 5 वाजता भेट दिल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी दिली.

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे (वय-65) यांचे शनिवार 24 सप्टेंबर 2022 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले होते. आज सकाळी 10 वाजता भोसरी येथील तळ्याकाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लांडगे परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्यासोबत सोबत आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळा भेगडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, शंकर जगताप उपस्थित होते.

Latest news
Related news