Pune : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Pune) पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी फडणवीस यांचा विविध मंडळांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

फडणवीस यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या गणपती मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ आदी मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष (Pune) विकास पवार आणि लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते. 

youtube.com/shorts/lFkxd4OIHCM

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share