Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट वॉच, सायकल वाटप

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलिसांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मार्ट वॉच, स्पोर्ट्स सायकल, ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी आमदार सुनील शेळके, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहर पोलीस हद्दीत 15 पोलीस स्टेशन आणि नव्याने पोलीस स्टेशन म्हणून मंजुरी मिळालेल्या तीन चौक्या आहेत. त्यातील सर्व पोलिसांना कार्यक्रमात स्मार्ट वॉच वाटप करण्यात आले. तसेच 540 स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आल्या. या सायकल पोलीस स्टेशन स्तरावर वितरित करण्यात आल्या आहेत. शहरात रात्र गस्तीसाठी स्थानिक नागरिकांची मदत घेऊन ग्राम सुरक्षा दल निर्माण करण्यात आले आहे. त्या दलातील सदस्यांना कार्यक्रमात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात नको तर संपुष्टात आली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना काही अडचणी निश्चित आहेत, पण त्या सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शहरातील गुन्हेगारी संपवा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितले. तसेच राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता काम करण्याचा सल्ला देखील पोलिसांना पवार यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.