sewing machine distribution : भाजपकडून 52 महिलांना शिवण यंत्राचे वाटप

एमपीसी न्युज : भारतीय जनता पार्टी वडगाव शहराच्या वतीने 52 महिलांना शिवण यंत्राचे मोफत वाटप करण्यात आले. (sewing machine distribution) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. लकी ड्रॉ पध्दतीने वाटप केलेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. सहभागी महिलांना देखील आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

 

माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा आमदार उमाताई खापरे, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ, पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुल यांच्या शुभहस्ते आणि मावळ तालुका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश उपाध्यक्षा ज्योतीताई जाधव, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सायली बोत्रे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, (sewing machine distribution) वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या उपस्थितीत आणि नगरसेवक भूषण सुभाषचंद्र मुथा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्षा आमदार उमा खापरे यांनी आपल्या मनोगतामध्ये या उपक्रमाचे कौतुक करताना महिला भगिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले.

 

स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी वडगांव शहर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेला हा उपक्रम तुम्हाला स्वावलंबन व आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाईल” असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ यांनी केले.माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासींयासाठी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत या व्यापक योजनेतून उर्वरित महिलांना देखील पुढील काळात शिवणयंत्र दिले जातील व विविध योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येईल याबाबतचे आपले मनोगत व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी

 

पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा कांचन कुल यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर विविध प्रकारच्या योजना तातडीने मार्गी लागतात आणि त्याचा लाभ विविध घटकातील नागरिकांना होतो याचा प्रत्यय या कार्यक्रमामध्ये दिसून येत आहे असे मत व्यक्त केले. (sewing machine distribution) मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी मागील चार वर्षात भारतीय जनता पार्टी वडगांव शहराने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व या उपक्रमाचे कौतुक करताना वडगाव शहर भारतीय जनता पार्टी यापुढे देखील वडगावकर नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना व उपक्रम निश्चितपणे राबवेल असे मत व्यक्त केले .

 

याप्रसंगी माजी सभापती निवृत्ती शेटे , एकनाथ टिळे , राजाराम शिंदे , पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माऊली शिंदे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, माजी उपसभापती व नगरसेवक प्रवीण चव्हाण, संतोष दाभाडे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे, माजी नगरसेवक अ‍ॅड. विजय जाधव, नगरसेवक किरण म्हाळसकर, नगरसेवक दिलीप म्हाळसकर , माजी उपनगराध्यक्षा नगरसेविका अर्चना म्हाळसकर, नगरसेविका सुनीता भिलारे, शरद मोरे ,  जेष्ठ नेते पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे, वसंतर भिलारे , विठ्ठल घारे, नामदेव भसे, खंडूशेठ भिलारे, नाथा घुले, मावळ भाजपा कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे,  संघटन मंत्री किरण भिलारे, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे,महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे,माजी सरपंच नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, वडगांव सोसायटीचे व्हाईस चेअरमन निलेश म्हाळसकर, संचालक अ‍ॅड.अजित वहिले, गणेश भालेकर, सुभाष ढोरे,माजी ग्रा. पं. सदस्या मेधा बवरे, सुनंदा म्हाळसकर , वैशाली म्हाळसकर,  श्रेया भंडारी,अश्विनी बवरे, सारिका भिलारे,  प्रियंका भोंडवे , सपना म्हाळसकर,सुवर्णा गाडे,शितल मुथा, शैला शिंदे, शंकर भोंडवे, दिपक भालेराव, शेखर वहिले, कुलदीप ढोरे, नामदेव वारिंगे, संतोष म्हाळसकर, नितीन गाडे, महेंद्र म्हाळसकर , किरण काळभोर, योगेश म्हाळसकर, महेश म्हाळसकर, श्रीधर चव्हाण, अतुल म्हाळसकर, संजय जानेराव, महेंद्र अ. म्हाळसकर, राजेंद्र (विकी) म्हाळसकर, अमोल ठोंबरे, सचिन कराळे,  हरीश दानवे ,  प्रज्योत म्हाळसकर, श्रीकांत चांदेकर, अमोल वाघवले, संतोष भालेराव, अमोल खोल्लम, गणेश भिलारे, राज चव्हाण, गोकुळ काकडे, मयूर चांदेकर, महेश निकम, गणेश वाघवले, बंटी निकम , निखिल तारू, भूषण वहिले, विजय फाटक,निलेश पाटील, प्रतीक काळे, नितीन ओव्हाळ, अजय भवार, प्रवीण नं. ढोरे, समीर गुरव,  सूर्यकांत भिलारे, जय भिलारे, तुषार शिंदे, अ‍ॅड.संदेश भिलारे, विकी म्हाळसकर , शिवा कटनाईक,  सुनील चव्हाण, राजेंद्र खरात, आकाश म्हाळसकर, प्रतिक मोतीबने, गणेश गवारे, शुभम कर्डिले, प्रकाश बोत्रे , अनिकेत सोनवणे, आदी उपस्थित होते. नगरसेवक प्रवीण चव्हाण आणि वडगांव शहर महिला मोर्चा अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

 

वडगांव शहरातील सुमारे 1700 महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला त्या सर्व महिलांना दुसरी आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आली. स्वागत शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले.(sewing machine distribution) प्रास्ताविक स्वीकृत नगरसेवक भूषण मुथा यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कल्पेश भोंडवे व रवींद्र म्हाळसकर यांनी केले.आभार प्रदर्शन सरचिटणीस मकरंद बवरे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.