Pune : शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या प्रकाशन

एमपीसी न्यूज : भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (सोमवारी) पुणे शहराच्या दौर्‍यावर येत असून शहरात त्यांचे तीन नियोजित कार्यक्रम होणार आहेत. त्या दरम्यान भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले जाणार आहे. (Pune) तसेच या कार्यक्रमा दरम्यान घर चलो संपर्क अभियानाचा शुभारंभ देखील केला जाणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार असून येरवडा येथील अण्णा भाऊ साठे हॉल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

त्यानंतर बाणेर बालेवाडी येथे 24 समान पाणी पुरवठा योजनेच्या फेज 1 चे लोकार्पण तसेच सूस महाळूंगे 70 कोटींच्या योजनेचे भूमिपूजन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट मैदान येथे होणार आहे. त्याच दरम्यान कर्वेनगर सनसिटी येथील 37 कोटी 4 लाख रुपयांच्या निधीमधून मुठा नदीवर पुलाच्या कामाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे.

MP Supriya Sule : पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी घटना – सुप्रिया सुळे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आणि कर्नाटक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (Pune) त्यामुळे उद्या होत असलेल्या पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस नेमक काय बोलणार, याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच लक्ष लागून राहिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.