Pune news: नवले ब्रीज अपघातग्रस्त जागेची पोलीस उपायुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज : शहरातील नवले ब्रीज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहन चालक भीतीखाली आहेत. काल झालेल्या अपघातात ३ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यापार्श्वभूमीवर  वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी कात्रज देहू रोड बायपासवरील नवले पुलाजवळील सर्व अपघात स्थळांना भेट देत पाहणी केली. बायपास परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी तात्पुरते आणि दीर्घकालीन उपाय शोधून काढण्यावर प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

भरधाव ट्रकने काल आठ वाहनांना धडक दिल्यामुळे तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. महिन्याभरात बायपासच्या नवले पुलापरिसरात चार मोठे अपघात झाले आहेत.

अवजड वाहन चालकानी बायपासच्या पहिल्या लेनवरून वाहने चालवली पाहिजे. त्याशिवाय भुमकर चौकापासून काही मीटर अंतरावर असलेल्या बायपास परिसरात विविध वाहतूक नियोजन करण्यात येणार आहे असे वाहतूक पोलिस उपायुक्त  राहुल श्रीरामे यांनी सांगितले.त्यामुळे  वाहनांचा वेग कमी होऊन  चालकांना जाग येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यांसंबंधी सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, “आम्ही लवकरच पुणे महानगरपालिका (पीएमसी), भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व इतर सर्व भागधारकांची संयुक्त बैठक बोलावणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी बायपास विभागाला दीर्घकालीन पायाभूत सोल्युशन्सची आवश्यकता असल्याचे शिसवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like