Pune : उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्यांच्या प्रभागात सर्वाधिक अन्नधान्य किट वाटप

Deputy Mayor, Standing Committee Chairman, Distribution of most food kits in the ward of Leaders

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट अतिशय गंभीर आहे. कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भागांत महापालिकेतर्फे अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहे. ज्या भागांत कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. तेथे हे किट वाटप करणे आवश्यक असताना उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्याच प्रभागात मोठ्या प्रमाणात किट वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे.

कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत तब्बल 12 हजार 300 किटचे वाटप करण्यात आले आहे. शिवाजीनगर – घोले रस्ता 2 हजार 300, ढोले पाटील रस्ता 6 हजार 100, भवानी पेठ 12 हजार 590, बिबवेवाडी 2 हजार 540, नगररस्ता 2 हजार 280, धनकवडी – सहकारनगर 3 हजार 203, वानवडी 3 हजार 182 असे दिनांक 21 मे पर्यंत 50 हजार किट वाटप करण्यात आले आहेत.

या किटमध्ये पीठ, तेल, डाळ, साखर, मसाला, दुधपावडर, मसाला, तांदूळ, चहा आशा वस्तूंचा समावेश आहे.

तर, पर्वती दर्शन भागात किट वाटपामध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून आला आहे. प्रत्येक किटमध्ये पुणे महानगरपालिकाने दिलेल्या यादीपैकी प्रत्येक किटमध्ये प्रत्येकी १ लिटर तेल पिशवी नसल्याचे आढळून आले आहे.

महानगरपालिकेने यादी जाहीर केली असताना सूद्धा किमान  1  लिटर प्रत्येक व्यक्तीगणिक म्हणजे केवळ पर्वती दर्शन भागातच जवळपास ८०० ते ९०० लिटर तेलाची अफरातफर केली गेली आहे. म्हणजे जवळपास 90 हजारांच्या पुढे हा आकडा गेला आहे.

आज अडचणींच्या काळात नागरिकांच्या हक्काच्या जिवनावश्यक गोष्टींमध्ये केला गेलेला प्रकार निंदनीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 29 च्या वतिने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. ह्या गोष्टीची महिनगरपालिकेने दखल त्वरीत घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

नागरिकांना जर अन्नधान्य किट मिळत असेल तर खाली दिलेल्या यादीप्रमाणे अगोदर तपासून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like