Pune News : माफी मागितली असतानाही कार्यकर्ते पाठवून अंकुश काकडे यांनी मारहाण करून घेतली – विनायक अंबेकर

एमपीसी न्यूज : शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्द असणारी कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक अंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आता विनायक अंबेकर यांनी आपली बाजू मांडली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मारहाण करण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

अंबेकर म्हणाले, अंकुश काकडे यांनी बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम घेत पुण्यातील राजकीय संस्कृती कशी समजुतीची आहे यावर भाषण दिलं होतं. त्याच अंकुश काकडे यांनी माझ्या कवितेबद्दल गिरीश बापट आणि पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना फोन करून माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर समजूतदारपणा दाखवून मी माफी देखील मागितली. मात्र त्यानंतरही अंकुश काकडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून मला मारहाण करून घेतली.

अंबेकर म्हणाले, अंकुश काकडे यांना माझं जाहीर आव्हान आहे. मी दररोज शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरही राजकीय पक्षावर कवितेच्या माध्यमातून टिपणी करणार आहे. मला त्यांनी रोखून दाखवावे. कोणाच्याही धाकदपटशाहिला भाजपचा कार्यकर्ता घाबरणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.