Udayanraje Bhosale : मराठा नसूनही देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले – उदयनराजे भोसले

एमपीसी न्यूज – देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी एवढे केले. याउलट पाटील, महाडीक, शिर्के, भोसले अशा आडनावाच्या फक्त पाट्या लावणार्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केले,असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केला. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

 

असं बोलतात की अशोकाच झाड स्वत: वाढत पण इतरांना सावली देत नाही.गेल्या सरकारच्या काळात मराठा आरक्षणाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली असती तर हा प्रश्न तेव्हाच मिटला असता.पण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाची धुरा होती त्यांनी काहीच केले नाही, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केली. ते शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोकल होते.

 

 

उदयनराजे म्हणाले की, मी जातपात मानत नाही. हे जातपात करण्यापेक्षा सरसकट सर्वच जातीमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले पाहीजे. आपल्याकडे पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व्याख्याच चुकीची केली आहे. त्याचा फटका सर्वांना बसत आहे. व्यक्ती कुठल्याही जातीची असू दे ना, दुर्बल घटकांना सरसकट सवलती द्या ना. तुम्ही फक्त मागासवर्गीयांना आरक्षण का देता, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.