Chakan : मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल विकणा-या चौघांसह भंगार व्यावसायिकास अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या सुरक्षारक्षकाने आपल्या चार मित्रांच्या मदतीने कंपनीतील माल चोरून नेला. चोरलेला माल एका भंगारच्या दुकानात विकताना पोलिसांनी भंगार व्यावसायिकासह चार चोरट्यांना अटक केली. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी केली.

जलालुद्दीन मोहमदरजा मसिहद्दीन खान उर्फ मणीहार (वय 32, रा. भांबोलीफाटा, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश), असिउल्ला शफीउल्ला शहा (वय 32, रा. वासुलीफाटा, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश), उस्मान अबुहरेरा शहा (वय 19, रा. वासुलीफाटा, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश), मैनूद्दीन मसिहद्दीन खान उर्फ मणीहार (रा. भांबोलीफाटा, ता. खेड. मूळ रा. उत्तरप्रदेश), भंगार व्यवसायिक परबत अजितनाथ साखरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कंपनीतील सुरक्षारक्षक महंमद यासीन (वय 24, रा. कालाकोटे कोटबाबू राजोरी सोलकी, जम्मू काश्मीर) हा अद्याप फरार आहे. याप्रकरणी राजन मोतीराम ठाकूर (वय 55, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली चाकण एमआयडीसी येथे ब्राण्डनबर्ग इंडिया प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीत महंमद यासीन हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या चार आरोपी मित्रांच्या मदतीने 22 सप्टेंबर रोजी कंपनीत चोरी केली. पाच जणांनी मिळून कंपनीतून कॉपर वायरचा बंडल, लग्जचे नग, अॅल्युमिनियम शीट/प्लेट, रेजिन प्लास्टिकचे दाणे असा माल चोरून नेला. याबाबत राजन ठाकूर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वाहनचोरी विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांना माहिती मिळाली की, या चोरीच्या घटनेतील आरोपी चोरलेला ऐवज एका भंगारच्या दुकानात विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार परिसरात सापळा रचून वाहनचोरी विरोधी पथक आणि पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी चार चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टेम्पोसह चोरलेला माल असा एकूण 5 लाख 99 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. चोरीचा माल घेणा-या भंगार व्यावसायिकाला देखील अटक करण्यात आली आहे. तर सुरक्षारक्षक महंमद यासीन हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस कर्मचारी विवेकानंद सपकाळे, हजरत पठाण, दादा पवार, रमेश गायकवाड, विनोद साळवे, सचिन उगले, अरुण नरळे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, जमीर तांबोळी, सचिन मोरे, यदु आढारी, योगेश्वर कोळेकर, महेश भालचीम, नाथा केकाण, राजकुमार हनमते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.