Wakad Crime News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणारी महिला ताब्यात 

एमपीसी न्यूज – भुजबळ चौक वाकड येथील ‘द ऍड्रेस कमर्शिया’ मॉल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने याठिकाणी छापा टाकून महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर, पाच पिडित महिलांची सुटका केली आहे. शुक्रवारी (दि.26) हि कारवाई केली. 

केतकी विजय खरात (वय 21, रा. जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे तसेच, तिचा साथिदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भुजबळ चौक वाकड येथील ‘द ऍड्रेस कमर्शिया’ मॉल मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाच महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत होते. याप्रकरणी एका महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच, पाच पिडित महिलांची सुटका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.