Talegaon : संस्कार प्रतिष्ठानचा हजारो झाडे लावण्याचा निर्धार – डॉ. मोहन गायकवाड

एमपीसी न्यूज – संस्कार प्रतिष्ठान जे एस पी एम कॉलेज ताथवडे, व्हालेंटिअरिंग ग्रूप, टाटा मोटर्स आणि वन विभाग मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पाचाणेगाव हद्दीतील वाघजाई डोंगराच्या माथ्यावर विविध उपयोगी 2500 झाडांचे वृक्षारोपण डोंगराच्या माथ्यावर करण्यात आले.

कार्यक्रमास टाटा मोटर्स फौंड्रीतील कामगार वर्ग तसेच जे एस पी एम महाविद्यालयाचे विभाग प्रमुख अमेय चौधरी, प्रो.प्रमिला पारेख, प्रो.दिपाली सुराणा, पाचाणे गावचे रहिवासी, मावळ वन विभागाचे आधिकारी वनक्षेत्रपाल सुनिल भुजबळ, टाटा मोटर्स समाज विकास विभागाचे अधिकारी मयुरेश कुलकर्णी, दिपक आमडेकर, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, दत्तात्रय माने, अनिल माने आदी उपस्थित होते.

डॉ. मोहन गायकवाड म्हणाले, झाडांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वसुंधरेला हिरवाईचा शालू नेसविण्यासाठी प्रत्येकाने तयार झाले पाहिजे. संस्कार प्रतिष्ठानतर्फे हजारो झाडे लावून वसुंधरेला हिरवाईचा शालू नेसविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन देखील करण्याची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.