Pune : शहरातील 12 प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 12 प्रमुख रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केला आहे.

फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, सोलापूर रस्ता, सातारा रस्ता, विमानतळ रस्ता, सिंहगड रस्ता, बाजीराव रस्ता, अशा रस्त्यांचा समावेश आहे. खमंग वासाचे पदार्थ रस्त्यांवरच तळले जातात. अंडाभुर्जी, वडापाव, भाजीपाला, अशी छोटीमोठी दुकाने थाटलेली असतात. मागील काही दिवसांपासून शहरात अतिक्रमण कारवाई जोरदार सुरू आहे. ही कारवाई आता रात्रीही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.