BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : देवदर्शन करणे पडले महागात; चोरट्यांनी दोन तासात केला तिजोरीवर हात साफ

एमपीसी न्यूज – एका कुटुंबाला देवदर्शनाला जाणे चांगलेच महागात पडले आहे. दोन तासांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.11) सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत घडली.

योगेश केशव मोरे (वय 34 रा. येवलेवाडी, खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास देवदर्शनासाठी गेले. यावेळी चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील 14 तोळे सोन्याचे दागिने व 15 हजार रोख रक्कम, असा एकूण 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मोरे रात्री आठच्या सुमारास घरी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement