Pune Mumbai Expressway: देवदूत टिमचे आजपासून कामबंद आंदोलन 

Devdut the quick response team (rescue team) working on Pune Mumbai expressway has gone on a strike demanding proper protective gear while attending accident patients & salary.

एमपीसी न्यूज-पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 24 तास आप्तकालिन सेवा देणार्‍या देवदूत कामगारांना कंपनीकडून एप्रिल महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. पगाराच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आर्यन कंपनीकडून कोणताही समाधानकारक खुलासा देण्यात न आल्याने आज सोमवारपासून देवदूतचे 70 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.

दोन दिवसांपुर्वी कामगारांनी मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळ, आयआरबी कंपनी, महामार्ग पोलीस यांना दिले होते.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. खालापूर ते किवळे दरम्यान देवदूतच्या सर्व सुविधायुक्त चार गाड्या काम करतात. तिन शिपमध्ये येथे 70 कामगार काम करतात. त्यांना मागील महिन्याचा पगार मिळालेला नाही.

तसेच आर्यन कंपनीचा रस्ते विकास महामंडळासोबतचा करार फेब्रुवारी महिन्यात संपला असल्याने आम्ही नेमके कोणाच्या अधिपत्याखाली काम करत आहोत याची माहिती मिळावी, देवदूत टिमला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुरक्षा साधने दिलेली नाहीत, काही दुर्घटना घडल्यास कोणाचाही आरोग्य विमा नाही, टिमची दैनंदिन चहापाणी, राहण्याची व नाष्ट्याची विशेष सुविधा बंद करण्यात आली आहे.

कामाची व पगाराची हमी नाही, मागील वर्षापासून पनवेल स्टेशनला लाईटची समस्या निर्माण झाली आहे ती आजुन सुटलेली नाही आदी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.