Vadgaon Maval : कृषी पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करा – माऊली दाभाडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होत आहे.त्यासाठी राज्य शासनाने या व्यवसायासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत, अशी मागणी कृषी व सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी केली आहे.

मावळ तालुक्यातील काही कृषी पर्यटन केंद्राची पाहणी करताना श्री दाभाडे यांनी ही मागणी केली.त्यांचे समवेत प्रगतशील  शेतकरी ज्ञानेश्वर(माऊली) ठाकर, कृषी पर्यटन संचालक रवी ठाकर, सोनबा गोपाळे गुरूजी होते.

मावळ तालुका हा सह्याद्रीच्या डोंगर  रांगामध्ये वसलेला असून गडकिल्ले,  लेण्या व गुहा, धार्मिक स्थळे यांनी संपन्न आहे.याशिवाय नैसर्गिक धबधबे, धरणाचे  मोठ मोठे जलाशय यांचे आकर्षण आहे. त्याचप्रमाणे पुणे मुंबई महामार्ग, रेल्वे मार्ग असल्याने  मावळ तालुका हा पर्यटकांचे आकर्षण आहे.त्यामुळे मावळ तालुक्यात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होत आहे. मात्र तालुक्यातील अंतर्गत रस्ते खराब आहेत. याशिवाय काही भागाकरीता नविन  रस्ते होणे गरजेचे असल्याचे सांगुन  दाभाडे म्हणाले की, काही भागात वीज आणि पाणी यांच्या सुविधा उपलब्ध  होणे गरजेचे आहे.

मावळ तालुक्यात कृषी पर्यटन व्यवसायाने  मोठा रोजगार निर्माण झालेला  असुन  शेती मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध  होऊ शकते,  असा विश्वास दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांची भेट घेऊन त्यांच्याशी वाढत्या कृषी पर्यटन व्यवसायातील अडचणी व प्रश्न यांची चर्चा करणार आहे, असेही श्री  दाभाडे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.