Pimpri News : शहराचा विकास करून दाखवला, शंका असेल तर समोरासमोर येऊन विचारा – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमदार लक्ष्मण जगताप पिंपरी-चिंचवड शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. माननीय शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्याइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही. तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, असे आव्हान भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना दिले.

भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही आमदारांनी (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) शहराची वाटणी केली आहे, अशी टीका शनिवारी (दि.16) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जगताप व लांडगे यांचे नाव न घेता केली होती. त्यावर दोन्ही आमदारांनी सावध भूमिका घेतली. तर, आमदार जगताप यांनी पवारांची टीकेची बातमी वाचून उत्तर देईन, असे सांगितले.

पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे आमदार महेश लांडगे म्हणाले. मात्र, शहराच्या विकासावर कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.