Rahatani : प्रलंबित विकास कामांचा आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी  न्यूज – रहाटणी तापकीरनगर प्रभाग क्रमांक 27मधील  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध कामाचा शुभारंभ आज आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.  प्रभाग क्रमांक 27 मध्ये पाण्याच्या नवीन पाईपलाईन व ड्रेनेज लाईन आदी कामाची सुरुवात करण्या आधी कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 27मध्ये पाण्याचा नवीन पाईप लाईन, ड्रेनेज लाईन आदी कामाच्या प्रयत्नासाठी प्रभागातील चारही नगरसेवक सातत्याने प्रयत्न करीत होते  त्यात ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब ञिभुवन, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत अण्णा नखाते, नगरसेविका सविता  खुळे, नगरसेविका सुनिता तापकीर यांचे प्रयत्न होते. कार्यक्रमास विजय लांडे, अमोल थोरात, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, नरेश खुळे, एकनाथ मंजाळ, राज तापकीर, शुभम नखाते, चंद्रकांत तापकीर, नामदेव शिंत्रे  आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.