Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र ( Devendra Fadnavis ) फडणवीस यांच्याबद्दल युट्युब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य करणे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी किंचक नवले (34) याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

Pune : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात एकाचा खून

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांकडून मुख्य आरोपी किंचक नवले याचा  शोध सुरू होता. तो वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याचे तपासात समोर आले. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाझार येथून अटक केली.

त्यानंतर त्याला मुंबईत आणून वांद्रे न्यायालयात हजर केले. ‘अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना जिवे ठार मारण्याची धमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आणि तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करत व्हायरल केला, या कटात आणखी कोण सामील आहे, याबाबतच्या चौकशीसाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक आहे’, असे म्हणणे पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले.न्यायाधीशांनी नवलेची दहा दिवसांच्या ऐवजी पाच दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मंजूर केली.

याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेच्या युवा शाखेचे शहर पदाधिकारी अक्षय पनवेलकर यांनी  सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एका मुलाखतीदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली आणि भाजप नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

तसेच  हा प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओ आपल्या ‘एक्स’ हँडलवरून व्हायरल करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आधीपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही या प्रकरणी न्यायालयाने 7  मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली ( Devendra Fadnavis ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.