Talegaon : ‘EASTIN EASY AISHWARYA -TALEGAON’ या थ्री स्टार हॉटेलचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – “EASTIN EASY AISHWARYA -TALEGAON” या थ्री स्टार हाॅटेलचे आज रविवारी (दि.9) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. संजयशेठ माळी यांचे हे हॉटेल असून ते हॉटेल ऐश्वर्याचे डायरेक्टर आहेत.

या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा तथा संजय भेगडे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, माजी नगराध्यक्षा बाळासाहेब जांभुळकर, अॅड रवींद्रनाथ दाभाडे, मावळ तालुका भाजपचे माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवाजी शेलार, मावळ तालुका ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष बाळासाहेब घोजगे यांच्यासह आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, सभापती, पदाधिकारी, इतर मान्यवर, ग्रामस्थ व मोठा मित्र परिवार उपस्थित होता.

हाॅटेलचे डायरेक्टर संजयशेठ माळी, त्यांच्या पत्नी रूपाली, चिरंजीव सिद्धार्थ व कन्या उत्कर्षा यांनी फडवीसांचे स्वागत करून  सत्कार केला. अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर हादीमुनी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.