Pune News : देवेंद्र फडणवीस गोव्यात व्यस्त, मग विरोधी पक्षनेत्याचा चार्ज कोणाकडे द्यावा ? 

एमपीसी न्यूज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात प्रत्यक्षात उपस्थित राहत नसल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चार्ज इतरांकडे द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने होताना दिसते.

त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेतू नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी भाजप नेत्यांना एक सवाल केला. रूपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केले आणि त्यातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘ महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राच्या सोडून गोव्याच्या समस्या मांडत आहेत. फडणवीस साहेब गोव्यात व्यस्त असतील तर विरोधी पक्ष नेत्याचा चार्ज कुणाकडे द्यायला हवा? भाजपच्या न्यायाप्रमाणे कुणाकडे द्यायला हवा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान सध्या राज्यात गोवा विधानसभेच्या निवडणुकावरून चांगलंच राजकारण रंगल्याचं दिसून येते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातही चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तर शेवटी राजकारण करायला गल्लीत यावं लागतं. हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.