Pune : पुण्यात आणखी दोन महापालिका हव्यात – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत असल्याने आणखी दोन महापालिका आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ नागरी सत्कार समिती कोथरूडतर्फे सुपुत्र महापौर मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ यांचा सोमवारी सायंकाळी सर्व पक्षीयांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले, पुणे शहरात मेट्रोचे काम अत्यंत वेगाने काम सुरू आहे. टू व्हीलर चालविण्यात पुणेकरांचा जागतिक क्रमांक आहे. नद्यांचा प्रोजेक्ट पुढे जाऊन प्रदूषण मुक्त पुणे करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करावे. कोथरूड ही सांस्कृतिक राजधानी आहे. मोहोळ यांची वागणूक संयमी आहे. काय बोललं पाहिजे, काय बोलू नये, हे त्यांना माहिती आहे. महाराष्ट्र नेत्यांच्या पुढील नेत्यांत मोहोळ यांचे नाव असेल.

पुण्याच्या काकडेंवर कुणाचाच अंकुश चालू शकत नाही. अंकुश काकडे यांचे भाषण बघून म्हणाले. कारण, एक काकडे आमच्याकडेही आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. आम्ही राजकीय अस्पृश्यता पाडत नाही. मोहोळ यांच्या राजकीय आयुष्याची ही तर सुरुवात आहे. अनेक महत्वाची पदे ही मुरलीधर मोहोळ यांना मिळतील. त्यांना उमदा नेता म्हणून बघतो.

मी 10 वेळा नगरसेवक, दोन वेळा महापौर होतो. मी गमतीने म्हणायचो, पाप केले तो नगरसेवक आणि महापाप केले तो महापौर बनतो. पुणे हे महाराष्ट्राचे भूषण आहे. खूप क्षमता या शहरात आहे. सातत्य ठेवून काम करावे लागेल. महापालिका केवळ भौतिक नव्हे तर सामाजिक जीवन जपायचे असते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like