Mumbai : देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

पाच वर्षे पारदर्शी सरकार चालवले

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला असून राज्यपालांनी राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने पाच वर्षे संधी दिल्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीस काम पाहणार आहेत. या काळात त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार नाही. 

निवडणुकीत महायुतीच्या बाजुने कौल मिळाला असूनही मुख्यमंत्रीपदाच्या वादातून अद्यापही नवीन सरकार स्थापन झाले नाही. आज मध्यरात्री आधीच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला नाही. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन होणार किंवा राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे हे संकेत आहेत का, अशा अनेक शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.

ही कोंडी सोडविण्यासाठी गडकरी पुढाकार घेणार असून आज त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होणार होती. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या घडामोडींकडे लागले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अद्यापही कोंडी न सुटलेली नाही. पत्रकार परिषदेत अडीच वर्षाची बोलणी माझ्यासोबत कधीही झाली नव्हती, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही प्रयत्न केला मात्र शिवसेना चर्चेसाठी तयार नाही, असेही सांगितले. मात्र, प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर कोणतीही टिका केली नाही. मात्र, भाजप लवकरच सत्ता स्थापन करेन, असा विश्वासही व्यक्त केला. त्यामुळे भाजप आता शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणार काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.