Pune : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. जे मंत्री पराभूत झाले त्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच, माजी खासदार उदयनराजे भोसले यांना पक्ष न्याय देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. तर, आवश्यकता पडलीच तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना सत्तास्थापणेसाठी लक्ष घालावे लागेल, असे सांगून एक प्रकारे पाटील यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा राजकीय विश्वात सुरू आहे.

येत्या 30 ऑक्टोबरला भाजप विधिमंडळ नेता निवड होणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांची बैठक यावेळी होणार आहे. बुधवारी दुपारी एक वाजता विधानभवन मुंबई येथे ही बैठक होणार असून त्यामध्ये पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.