BIHAR ELECTION : एनडीएच्या विजयात देवेंद्र फडणवीसांचे योगदान मोठे, भाजप नेत्याचा दावा

एमपीसी न्यूज : देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असलेले अभ्यासू नेतृत्व, प्लॅनर आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा ते बिहारमध्ये गेले तेव्हा त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन योजनाबद्ध नियोजन केले होते. ते दूरदृष्टीचे नेते असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी त्यांच्यावर बिहारची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे बिहार निवडणुक विजयामध्ये देवेंद्र फडणीस यांचे देखील योगदान मोठे असल्याचे सांगत भाजप नेते राम शिंदे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 

 राम शिंदे म्हणाले, बिहार राज्याला पुढे घेऊन जात असताना नितीश सरकारने दळणवळणाची साधने निर्माण केली, शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या, वीज जोड दिले, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविले याला बिहारच्या जनतेने प्रतिसाद दिला. त्यामुळेच बिहार मध्ये एनडीएला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळताना दिसत आहे. अंतिम निकालही एनडीएच्या बाजूनेच लागेल आणि बिहारमध्ये फक्त एनडीएचेच सरकार येईल. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे..

बिहार निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीवर आहे. याचा अर्थ एक्सिट पोल आणि सी व्होटर यांची मतं सपशेल फेल होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या विरोधात जनमत जाणार असा समज पसरवला जात होता तो आता खोटा ठरताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.