Devendra Fadnvis: दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत यायला तयार होती – देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadnvis: Two years ago, the NCP was ready to come with us - Devendra Fadnvis 'भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेनेची सोबत हवी असल्याचे सांगितल्याने ते प्रकरण थंड पडले'

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत येण्यास तयार होती, पण आमच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना सोबत हवी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हे प्रकरण थंड पडले, असे खळबळजनक वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुण्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या खळबळजनक वक्तव्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी तेव्हा चर्चाही झाल्या होत्या, मात्र शिवसेनेलाच सोबत ठेवायचे असल्याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याची सल आज फडणवीस यांनी पुण्यात बोलून दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची परिस्थिती लक्षात घेता, राज्याच्या प्रमुखांनी समन्वय साधला पाहिजे. पण, हे होताना दिसत नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली.

 

‘दी इनसायडर’ या यूट्यूब चॅनलसाठी पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेली देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक राजकीय गौप्यस्फोट केले आहे. पाहा सविस्तर मुलाखत…..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.