Pune : भवानी माता पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ

एमपीसी न्यूज – श्री भवानी माता पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पूष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्सव समुदायिकरित्या साजरा करण्यात आला. भवानी पेठेतील मंदिरातील श्री भवानी माता पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ झाला.

याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मनीषा लडकत, अर्चना पाटील, योगेश समेळ, अविनाश बागवे, आरती कोंढरे, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक आनंद रिठे, प्रवीण चोरबेले, सम्राट थोरात, शीतल सावंत, कमल व्यवहारे, योगेश समेळ, भीमराव पाटोळे, अभय छाजेड, अजय खेडेकर, संदीप लडकत, तुषार पाटील, विजय जाधव, संजय मोरे, संगीत तिवारी, माधव देशपांडे, मीनाक्षी राऊत, दीपक माळी, सभासद, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like