Pune : धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना ( Pune)  कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी क्वारंटाईनआहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.

Bhosari : रक्तदान शिबिरामध्ये 593 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत. याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन दिली.

त्यांनी म्हटले की,  नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण ( Pune) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.