Dhananjay Munde News :   … तर श्रवणाखाली देण्याची सुद्धा योजना असायला हवी – मंत्री धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज – ज्या वेळी यंत्र देऊन सुद्धा ऐकता येत नसेल, तेव्हा श्रवणाखाली देण्याची सुद्धा योजना असायला हवी. जिथं मशीन काम करत नाही, तिथं हाताने काम करायला हवं, अशी टीका सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी आंदोलनाबाबत असलेल्या भूमिकेबाबत केली.

भोसरी येथे खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री मुंडे बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

ते पुढे म्हणाले, “शेतकरी दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांचे तिथे रक्त सांडत आहे. त्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला भाजपने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, ही लाजिरवाणी बाब आहे. शेतकरी जिवंत राहिला तर तुम्ही आम्ही जिवंत राहू. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत केंद्र सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत मंत्री मुंडे म्हणाले, यंत्र देऊन सुद्धा ऐकता येत नसेल, तेंव्हा श्रवणाखाली देण्याची सुद्धा योजना असायला हवी. जिथं मशीन काम करत नाही, तिथं हाताने काम करायला हवं.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.