Mumbai News : धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार घेतली मागे

एमपीसी न्यूज : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणार्‍या तरूणीने ही तक्रार मागे घेतली आहे. यामुळे मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

एका तरूणीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासह धमकावण्याचे आरोप केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. यानंतर स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मुंडे यांच्यावरील आरोपांनी प्रचंड खळबळ उडाली होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीने त्यांची पाठराखण केली होती. या प्रकरणातील तक्रारदार महिलेने आता आपली बलात्काराची तक्रारच मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव आपण तक्रार मागे घेत असल्याचे तिने तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.