Pune : धनगरसमाजाला आरक्षण दया नाहीतर सतेतून बाहेर पडा ; पुण्यातील धनगर समाजाच्या मेळाव्यात उमटला सूर 

एमपीसी न्यूज : धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी करावी व समाजाला एस. टी. मध्ये जातीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी भाजप सरकार चले जावं आक्रोश मोर्चा हेमंत पाटील यांनी बालगंधर्व चौकात काढला. या मोर्चात महाराष्ट्रातील धननगर बांधव उपस्थित होते.  

यावेळी बोलताना भारत अगेंस्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पटली म्हणाले , हा आमचा मोर्चा 225 वा असून हे भाजप सरकार धनगर समाजाचा आवाज दाबण्याचे काम करत असून, आम्ही या सरकारचा निषेध करतो व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की टिसचा अहवाल 30 ऑगस्ट 2018 रोजी येणार आहे. आज 18 दिवस होऊन गेले असतानाही अहवाल आला नाही. जेष्ठ नेते शरद पवार धनगर आदिवासी समाजात भांडणे लावण्यासाठी मधुकर पिचड यांना पुढे केले.

त्याचप्रमाणे , ज्या पवार घराण्याने धनगर समाजाच्या मताने देशाचे राजकारण केले त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये उगाच समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी काहीही खटाटोप करू नये, ज्यावेळी 50 वर्षे सरकार तुमचं होत त्यावेळी तुम्हाला धनगर समाजाची अमलबजावणी करता आली नाही वेळ पडल्यास मीच बारामती लोकसभा मतदार संघ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहील त्यासाठी समोर बसलेल्या असंख्य बांधवांची साथ हवी असे देखील हेमंत पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले धनगर समाजाच्या विकासासाठी आम्ही महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभेच्या 180 जागा माळी,धनगर,मराठा मुस्लिम वंजारी मातंग,दलित आदी जातीं समूहाला घेऊन लढवणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.