Pune – आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची केली तोडफोड

एमपीसी न्यूज – धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुण्यातील आदिवासी संशोधन व विकास प्रशिक्षण संस्थेत निवेदन देण्यासाठी आलेल्या दोन-तीन व्यक्तींनी या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज शुक्रवारी (दि.24) दुपारी  घडली.

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाने आक्रमक स्वरूप घेतले असून समाजाची दिशाभूल करून खोटी माहिती देणार्या आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हल्ला करून धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. बार्टीच्या कार्यालयाजवळ असलेल्या व्हिआयपी गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला व कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहे.

आंदोलकांनी या कार्यालयात भंडारा उधळत खुर्च्यांची तोडफोड केली. आरक्षणाच्या मागणीचे पत्रक हवेत उधळले आणि पसार झाले. दरम्यान घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु आरोपींनी तोपर्यंत पळ काढला होता. घटनेची अधिक माहिती पोलिसांनी घेतली असून अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.