pune : 10 ऑगस्टला पुण्यात धनगर समाजाचं आंदोलन

एमपीसी न्यूज –  ‘भाजप सरकार चले जाव’ची घोषणा देत 10 ऑगस्टला पुण्यात धनगर समाजाचं आंदोलन भव्य आंदोलन होणार आहे. पुणे विधान भवन येथे धनगर समाजातील सर्व आजी-माजी आमदार, महापौर, जिल्हापरिषद सदस्य येऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळाव यासाठी हे आंदोलन होणार आहे. आज पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.

असं असेल धनगर समाजाचे आंदोलन

10 ऑगस्टला पुण्यात एक दिवशीय लाक्षणिक उपोषण

14 ऑगस्टला राज्यातील सर्व तहसील कार्यालयावर एकदिवसीय मोर्चा व ठिय्या

24 ऑगस्ट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

8 सप्टेंबर रोजी चौंडी येथे महामेळावा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.