Dhanore : चौघांनी केली घरफोडी, साडे चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – धानोरे गावात चार चोरांनी (Dhanore) घरफोडी करत घरातील तब्बल साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घरफोडी सोमवारी (दि.29) पहाटे दोन ते अडीच या अवघ्या अर्धा तासात झाली आहे.

याप्रकरणी स्वप्निल हनुमंत गावडे (वय 32 रा. धानोरे) यांनी फिर्याद दिली असून 4 अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपिंनी बंद घराचे कुलुप लोखंडी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला.त्यांनी घरातील 4 लाख 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Dhanore) तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.