Dhanori news : महिलांनी मारहाण केल्यामुळे रिक्षा चालकाने खाणीत उडी घेऊन संपवले जीवन

एमपीसी न्यूज –  महिलांनी मारहाण केली त्यामुळे आपला अपमान झाला असल्याने धानोरी येथील एकाने खाणीत उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्या करणारा रिक्षा चालक होता.अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव) असे त्याचे नाव आहे. 

धानोरी परिसरात दोन दिवसांपूर्वी अजयने खाणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. त्याचे कारण आता समोर आले आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून त्याला मारहाण केली होती. याबाबत त्याच्या पत्नीने  विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

MPC News Podcast 27 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अजय टिंगरे हा रिक्षा चालवण्याचे काम करतो . 23 मार्च रोजी रात्री अजय हा दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याने घरासमोर उभे राहून शिवीगाळ करू लागला. शेजाऱ्यांनी त्याच्या बायकोला त्याला  समजावून सांगायला लावले. त्यानंतर अजय हा घरात जाऊन झोपला. मात्र  दुसऱ्या दिवशी सकाळी  शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले, तो झोपेत असतानाचा त्याला मारत घराबाहेर आणले. अजयच्या बायकोने त्यांना मारू नका ,अशी विनवणी केली, मात्र ते त्याला मारत राहिले. लोक जमायला लागल्यावर ते निघून गेले.

त्यानंतर अजय टिंगरे हा गाडी घेऊन घराबाहेर पडला.मात्र त्याच्या डोक्यात गावात महिलांनी मारहाण केल्यामुळे अपमान झाला आहे याचा राग  होता. त्या रागाच्या भरात त्याने विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील खाणीत उडी मारून आत्महत्या केली.

या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.