Talegaon Dabhade : धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेतर्फे बनेश्वर स्मशानभूमीस २० सिलेंडर सुपूर्त

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था गेली २० वर्ष तळेगाव दाभाडे येथे कार्यरत असून,पंधरा दिवसापूर्वी बनेश्वर विद्युतदाहिनी मधील गॅस संपल्यामुळे कोरोना बाधित मृतदेह अर्धवट जळल्याचे निदर्शनास आले होते.

_MPC_DIR_MPU_II

सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व सामाजिक बांधिलकी म्हणून, व तळेगाव शहराची गरज लक्षात घेता,पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेतर्फे बनेश्वर स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीसाठी वीस गॅस सिलेंडर देण्याचे पत्र तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांचेकडे सुपूर्त करताना संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विजय शेटे व सचिव विनोद टकले आदी उपस्थित होते.

तसेच या वीस सिलेंडरची रक्कम तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये चेक स्वरूपात चेक क्र.१३९३२९ (जनता सहकारी बँक ) देण्यात आलेली आहे. असे सामाजिक उपक्रम पतसंस्था सतत वीस वर्षे राबवित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.