Pune News : एकतर्फी प्रेमातून मजनूचा तरुणीच्या घरासमोर धिंगाणा, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरासमोर गोंधळ घालत तिला उचलून घेऊन जातो तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी दिली. विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील यमुनानगर मध्ये 25 सप्टेंबर च्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी एका 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून आरोपी राहुल धुमाळ (वय 25) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि सोळा वर्षे मुलगी एकाच परिसरात राहतात. मागील एक वर्षापासून आरोपी त्या मुलीचा पाठलाग करतोय. आरोपीने या मुलीला स्वतःचा मोबाईल नंबर देऊन फोन करण्यासाठी सांगितले. परंतु अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिला.

त्यानंतर ही आरोपीने तिच्या घरासमोर येऊन ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला उचलून घेऊन जातो’ तुम्हाला काय करायचे ते करा असे बोलून गोंधळ घातला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.