Kolhapur News : धोनी आणि रोहित शर्माच्या फॅन्सची कोल्हापूर मध्ये मारामारी, एकाला उसाच्या शेतात नेऊन मारले 

Dhoni and Rohit fans fight in Kolhapur; one was taken to sugarcane field and beaten.

एमपीसी न्यूज – सलामीवीर रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांच्या फॅन्समध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूरातील कुंदनवाडी याठिकाणी ही घटना घडली आहे. 15 ऑगस्ट रोजी धोनीने जाहीर केलेल्या निवृत्तीनंतर त्याच्या फॅन्सी सर्वत्र पोस्टर लावले होते. त्यानंतर रोहित शर्माला खेलरत्न जाहीर झाल्यानंतर रोहितच्याही फॅन्सनी रोहितचे पोस्टर लावले. रोहितचे पोस्टर काही जणांनी काढल्यानंतर त्याचे फॅन्स रागावले.

काही अज्ञात लोकांनी रोहितचे पोस्टर्स काढले असले तरी त्याच्या चाहत्यांना हे काम कोणी केले, हे समजले. त्यांनी धोनीच्या चाहत्यांना याबाबत जाब विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर बाचाबाची सुरु झाली.

hiरोहित शर्माच्या एका चाहत्याने धोनीच्या फॅनला शिवी हासडली आणि त्यानंतर मारामारीला सुरुवात झाली. रोहितच्या ज्या चाहत्याने शिवीगाळ केली होती त्याला उसाच्या शेतात नेण्यात आले आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणाबाबत भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने भाष्य केलं आहे. सेहवाग त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “खेळाडू हे संघापुरते एकत्र असतात. काही खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांशी बोलतंही नाहीत. ते आपल्या कामाशी काम ठेवतात. पण काही फॅन्सतर वेड्यासारखे वागतात. कोणीही अशी मारामारी करू नका. कारण भारतीय संघ एक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.