Dhoni Birthday Poster: वाढदिवसाआधीच महेंद्रसिगं धोनीचे ‘बड्डे पोस्टर’ का होतंय व्हायरल ?

Dhoni Birthday Poster: Why is Mahendra Singh Dhoni's 'birthday Poster' going viral even before his birthday? धोनीचा हा 39 वा वाढदिवस आहे. परंतु, त्याच्या वाढदिवसाच्या 10 दिवसांपूर्वीच देशभरात त्याच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

एमपीसी न्यूज- कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस सात जुलै रोजी असतो. मात्र, सोशल मीडियावर वाढदिवसाआधीच धोनीचे ‘बड्डे पोस्टर’ व्हायरल होत आहे.

भारतीय संघाला एकदिवसीय आणि T20 विश्वचषक तसेच एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार एमएस धोनीचा पुढील महिन्यात सात जुलैला वाढदिवस आहे.

धोनीचा हा 39 वा वाढदिवस आहे. परंतु, त्याच्या वाढदिवसाच्या 10 दिवसांपूर्वीच देशभरात त्याच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

शनिवारी रात्रीपासून #DhoniBirthCDP ट्विटरवर ट्रेंड होत आहे. खरंतर धोनीच्या वाढदिवसाचा ‘कॉमन डीपी’च प्रसिद्ध केला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धोनीच्या चाहत्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एम एस धोनीचा हा पोस्टर शेअर करत वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या आहेत.


धोनीने मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर आतापर्यंत एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. हे वर्ष त्याच्या कारकिर्दीचे शेवटचे वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.

असे असले तरीही लॉकडाऊनमध्ये धोनी रांचीमध्ये आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे. त्यासंबंधी त्याचे व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like