Dhoni Resume Practice: ‘आयपीएल’च्या सरावाला धोनीने केली सुरूवात

एमपीसी न्यूज – ‘आयपीएल’ गव्हर्निंग काऊन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत  ‘आयपीएल’च्या तेराव्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे जवळपास चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर ‘आयपीएल’च्या सरावाला पूर्व कप्तान  महेंद्रसिंग धोनीने सुरवात केली आहे. 

युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना 20 ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये धोनीने बंद दाराआड सराव केल्याची माहिती झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

धोनी गेल्या आठवड्यात जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आला होता. त्यावेळी त्याने इन-डोअर सुविधांचा वापर करत सराव केला. त्याने बॉलिंग मशीनचा वापर करत फलंदाजी केली. त्याने गेल्या आठवड्यात वीकएंड्सला (शनिवारी-रविवारी) दोन दिवस बॅटिंग कसून सराव केला. पण त्यानंतर मात्र तो परत फिरकला नाही असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.