Dhoni Retires : तू नेहमी सर्वांच्या हृदयात राहशील ; दिग्गजच खेळाडूंनी धोनी बद्दल व्यक्त केल्या भावना 

एमपीसी न्यूज – टिम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलवीदा करत क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. धोनीच्या निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येताहेत. सर्वजण धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त करत असून त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाद्दल धन्यवाद देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भारताचा पूर्व कर्णधआर व विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा एका युगाचा अंत आहे. तो भारत आणि जगातील क्रिकेटसाठी उत्तम खेळाडू राहीला व क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये याची बरोबरी करणं कठीण होईल अशी प्रतिक्रिया सौरव गांगुली यांनी बीसीसीआयतर्फे दिली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्वीट करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 2011 हा क्षण माझ्यासाठी स्पेशल असल्याचे सचिनने म्हटलंय. भारतीय क्रिकेटमध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे. तुझ्यासोबत 2011 विश्वकप जिंकणं आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. तुला आणि तुझ्या परिवाराला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा ! असं ट्वीट सचिनने केलं आहे.

भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला बोलताना म्हणाले की, तुझ्यासोबत ड्रेसिंग रुमचा भाग असणं आणि तुझी चांगली कामगिरी पाहणं हा बहुमान आणि सन्मान आहे. भारताच्या एका महान क्रिकेटपटूला सलाम. एन्जॉय. गॉड ब्लेस एमएस धोनी.

धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीनं भावनिक ट्वीट केलं आहे. विराट म्हणाला, एक दिवस प्रत्येकाचा प्रवास संपतो, परंतु तुमच्या जवळच्या व्यक्तीनं निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मन भरून येतं. लोकांनी तुझं यश पाहिलं आहे पण मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे. तू या देशासाठी जे केलं आहेत, ते प्रत्येकाच्या हृदयात कायम राहिल

धोनी सारखा खेळाडू परत होणे नाही. ना कोई है, ना कोई था, ना कोई होगा एम एस धोनी जैसा. धोनीचा लोकांशी असलेला कनेक्ट होता व तो कित्येक क्रिकेट प्रेमींसाठी घेरातीलच एक व्यक्ती होता असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केले आहे.

भारताचा सलामी फलंदाज शिखर धवन याने धोनीला कप्तान, लिडर आणि लिजंड असे म्हणत देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

कसोटीपट्टू व्ही व्ही एस लक्ष्मण याने धोनीचे कौतुक करत त्याचा एका लहान गावातून भारतीय संघाला विजयी संघ बनवण्याची वाटचाल अतुलनीय होती असा उल्लेख केला आहे.

भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे असे म्हणाले की, महान आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन. तुझ्यासोबत खेळणं हा अभिमान होता. कर्णधार म्हणून तुझे शांत वर्तन कायम स्मरणात राहील. तुला खूप खूप शुभेच्छा.

पाकिस्तानी माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने धोनीच्या नेतृत्वाचे कौतुक करत क्रिकेट इतिहास धोनी शिवाय अपूर्ण राहील असे म्हण्टले आहे. सौरव गांगुली याने जरी टीम उभी केली असली तरी त्या टीमला योग्य मार्गदर्शन आणि जिंकण्याची सवय धोनीने लावली असा उल्लेख शोएब अख्तर याने केला आहे. क्रिकेट मधील एका उगाच अंत झाला असे गौरवउद्गार अख्तरने आपल्या यु ट्यूब चॅनेल वरती काढले आहेत.

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी आणि रमिज राजा यांनी धोनीचे कौतूक केले आहे. रमिज राजा यांनी तर धोनीला डिआरएस नियमाचा अचूक अंदाज घेणारा खेळाडू म्हणून सांगितले आहे.

इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर म्हणाला, तू माझ्यासाठी एक हिरो आहेस. अविश्वसनीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल अभिनंदन एमएस धोनी! तुझा प्रतिस्पर्धी म्हणून खेळणं हा माझा सन्मान आहे असं मी समजतो.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने धोनीचे रिटायरमेंट क्लबमध्ये स्वागत केले व त्याच्या कारकीर्दीला जादूई कारकीर्द म्हणून संबोधले.

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला, 2011 चा वर्ल्ड कप हा तेंडुलकरचा निरोप समारंभ असला, तरी त्या वर्ल्डकपचा सूत्रधार धोनीच होता. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अविश्वसनीय आहे. तो आतापर्यंतचा सर्वात उत्तम ‘व्हाईट बॉल’ कर्णधार आणि फिनिशर आहे. यावर कुणाचंही दुमत असून शकत नाही.

याशिवाय आयसीसी ने धोनीच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्याला सर्वात यशस्वी कप्तान संबोधले आहे. क्रिकेट जगतातून सर्वानी धोनीला शुभेच्छा देत त्याने टीम इंडियासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.