Dhule News: एसटीची आंतरराज्य बससेवा पाच महिन्यांच्या ‘ब्रेक’ नंतर पुन्हा सुरू

धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत या मार्गांवरील आंतरराज्य बससेवेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली एसटीची आंतरराज्य बससेवा आज (सोमवार) पासून सेवा सुरू झाली. सध्या महाराष्ट्र-गुजरात राज्य अशी बससेवा सुरू होत आहे.

धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत या मार्गांवर आंतरराज्य बससेवा सुरू करण्यात आली आहे. एका सीटवर एकच प्रवाशी या प्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. टप्प्याटप्प्याने अन्य आंतरराज्य मार्गांवरही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्यप्रदेशसाठी देखील आंतरराज्य बस सेवा सुरू होणार आहे. हळूहळू सर्वच मार्गांवरील एसटीची सेवा सुरळीत सुरू होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून एसटीची सेवा ठप्प झाली होती. साधारण पाच महिन्यांनंतर एसटीची आंतरराज्य बस सेवा पुन्हा सुरु झाली आहे. 20 ऑगस्टपासून एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर आता आंतर राज्य बस सेवा सुरु झाल्यानं एसटीची सेवा सुरळीत सुरु होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.