Bhosari : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे मधुमेह मार्गदर्शन शिबिर

एमपीसी  न्यूज – प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ‘राजयोगी जीवनशैलीव्दारे निरोगी जीवन’ या उपक्रमातर्गंत ‘मधुमेह कारणे व उपाय’ याबाबत दोन दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. 
भोसरी, आळंदी रोडवरील रामस्मृती लॉन्स येथे शनिवारी (दि.11) आणि रविवारी (दि.12) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान हे शिबिर होत आहे. यावेळी मधुमेह तज्ञ्ज डॉ. उज्वल कापडणीस, नेत्रतज्ञ्ज डॉ. मल्हार देशपांडे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी पॉवर पॉंईट प्रेझेंटेशन द्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच कोणता आहार कशा पद्धतीने घ्यावा, व्यायाम आणि मधुमेह नियंत्रणाचा काय संबंध आहे, कोणता व्यायाम चांगला आहे. रनिंग, वॉकींग, प्राणायम, आसने, मसाज, अक्युप्रेशर, व मेडीटेशन, या व्यायाम प्रकाराबद्द्ल मार्गदर्शन केले जाणार आहे.
ताणतणाव व आरोग्याचा काय संबंध आहे, चिंता, भय याचा आणि मधुमेह व इतर आजाराशी काय संबंध आहे. मधुमेहात काय काळजी घेतली पाहिजे. कुठल्या तपासण्या केव्हा केल्या पाहिजेत, औषधे घेताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती दिली जाणार आहे. तरी या शिबिरचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणी करण्यासाठी 9561631814, 9766346150 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.