Vajpeyee Medical College : वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा आकृतीबंध तयार

एमपीसी न्यूज : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून तत्वत: मंजुरी मिळाली असून लवकरच विशेष पथकाद्वारे पाहणी होणार आहे.

दरम्यान या महाविद्यालयासाठी आवश्यक तज्ज्ञ प्राध्यापक, कुशल तंत्रज्ञ आणि अन्य पदे असे एकूण 594 पदांचा आकृतीबंध तयार झाला आहे.

या संदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर मान्य केला. आता पुढील शैक्षणिक वर्षात 2021-22 मध्ये 100 विद्यार्थ्यांसह हे महाविद्यालय सुरु करण्याची शिफारस राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे विद्यापीठाने केली आहे. राज्य शासनाला शिफारस करण्यात आली आहे.

हा प्रस्ताव पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे. तत्पुर्वी महाविद्यालयासाठी आवश्यक तज्ज्ञ प्राध्यापक, कुशल तंत्रज्ञ आणि अन्य पदे असे एकूण 594 पदांचा आकृतीबंध तयार झाला आहे. विशेष पथकाच्या पाहणी दौऱ्यानंतर हा आकृतीबंध मान्यतेसाठी पाठविला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.