Emotional Wellbeing Program : भावनिक स्वास्थ सुधारण्यासाठी आज जॉईन करा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ प्रगती सुरेका यांचे ऑनलाईन सेमिनार

एमपीसी न्यूज – सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण आयुष्यातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी सतत धावपळ करत असतो. अशात शारिरीक समस्या तर निर्माण होतातच सोबत यश अपयश यामुळे मोठा मानसिक ताण तणावाचा देखील सामना करावा लागतो. मन, शरीर याचा भावनिक स्वाथ्य याच्याशी जवळचा सबंध असतो पण, कळत नकळत आपण याकडे दुर्लक्ष करतो. क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ प्रगती सुरेका यांनी भावनिक क्षमता संसाधनांचा वापर करून आपले भावनिक स्वास्थ सुधारण्यासाठी आज (बुधवारी दि.15) संवाद सेमिनार आयोजित केला आहे.

या सेमिनारच्या माध्यमातून भावनिक स्तरावर उपयोगी पडणा-या विविध बाबींची सविस्तर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये क्रिया – प्रतिक्रिया, संवाद पद्धती, आत्मविश्वास, एखादी भावना किंवा विचार आणि त्यापाठीमागचा कार्यकारण भाव, स्वत:ला जाणून घेणे, स्वयंप्रेरणा, नियंत्रण, यश मिळविण्यासाठी सकारात्मक उर्जेचा वापर, विचारांवर नियंत्रण यासारख्या विविध गोष्टींवर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. बुधवारी सायंकाळी 4.00 ते 5.30 या वेळेत हा सेमिनार पार पडेल, सेमिनारसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

भावनिक क्षमता संसाधन (EaR) ही स्वत:ला जाणून घेण्याची आणि भावनिक क्षमता सुधारण्यासाठी प्रात्यक्षिक व कौशल्य आधारित पद्धत आहे. आयुष्यात शरीर आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल महत्वाचा असतो. भावनिक क्षमता संसाधन याच्या मदतीने प्रार्थना, प्रवास, प्रभावी संवाद, शांत झोप, सकस आहार, नियमित व्यायाम, आपली बलस्थाने ओळखणे यांचा आयुष्यात यासारख्या सवयींचा आयुष्यात अंर्तभाव करता येऊ शकतो.

ऑनलाईन सेमिनार JOIN करण्यासाठी येथे click करा…

(Meeting ID: 883 4754 2866
Passcode: 403020)

अधिक माहितीसाठी – 
गुरलीन सलगोत्रा
[email protected]
8826122225

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.