Pune : पायी जाणा-या मुलीच्या पर्समधून डायमंडच्या अंगठ्या चोरीला

परिहार चौकातील घटना

एमपीसी न्यूज – परिहार चौकातून पायी जात असताना मुलीच्या पर्समधील तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या डायमंडच्या अंगठ्या अज्ञात इसमाने चोरून नेल्या. ही घटना दि. 3 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

याप्रकरणी एका 58 वर्षीय महिलेने चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादी या त्यांच्या राहत्या घरापासून परीहार चौकात पायी जात असताना त्यांच्या मुलीच्या हातात असलेल्या पर्समधून कोणीतरी अज्ञात इसमाने चार लाख 96 हजार रुपये किमतीच्या प्लेटीनियमच्या दोन डायमंडच्या अंगठ्या चोरून नेल्या. या अंगठ्या पर्समधील मोठ्या कप्प्यात आणखी एका छोट्या पर्समध्ये ठेवल्या होत्या. या छोट्या पर्ससह या अंगठ्या चोरीला गेल्या आहेत.

चतुःश्रूंगी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.