PDFA LEAGUE 2022 : डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय

एमपीसी न्यूज – दिएगो ज्युनिएर्स क्लबने पीडीएफए फुटबॉल लीग स्पर्धेत आपले अपराजित्व कायम राखताना अ गटातून आपली आघाडी कायम राखली. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी युनायटेड पूना स्पोर्टस अकादमीचा 1-0 असा पराभव केला.

सामन्यातील एक मात्र गोल इवान लाझरस याने 36व्या मिनिटाला केला. या सामन्यानंतर अ गटात दिएगो ज्युनिएर्स संघाने 3 सामन्यातून सात गुणांची कमाई करून आपली आघाडी कायम राखली. दिएगो ज्युनिएर्स स्पर्धेत अजून अपराजित आहे.

दरम्यान, याच गटातून डेक्कन सी आणि एफसी बेकडिन्हो यांनी आपले सामने बरोबरीत सोडवून गटातील अपराजित्व कायम राखले. डेक्कन सी संघाने सनी डेजला 1-1 असे बरोबरीत रोखले. हर्षल दिक्षीत याने 15व्या मिनिटाला गोल करून डेक्कन सी संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर सामन्याच्या 60व्या मिनिटाला विनायक अनमोल याने सनी डेजला सामन्यात बरोबरी राखून दिली. डेक्कन सीचे दोन सामन्यातून चार गुण झाले आहेत.

नंतर झालेल्या सामन्यात एफसी बेकडिन्हो क्लबने एफसी जोसेफ संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला मोहन पाटिलने एफसी बेकडिन्होचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर एफसी जोसेफकडून प्रविण नागरी याने प्रथम 26व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली आणि नंतर 34व्या मिनटिला त्याने दुसरा गोल करून क्लबला आघाडीवर नेले. मात्र, त्यांना आघाडी टिकवता आली नाही. सामन्याच्या व्या53 मिनिटाला सौरभ पाटील याने एफसी बेकडिन्होला बरोबरी साधून दिली. एफसी बेकडिन्होचे 2 सामन्यातून चार, तर एफसी जोसेफचे 3 सामन्यातून चार गुण झाले आहेत.

डी गटातील सामन्यात डायनामाईटस संघाने सुरज लाडने 35व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर खडकी ब्लूजचा 1-0 असा पराभव केला.

निकाल –

  • सप महाविद्यालय द्वितीय श्रेणी गट अ
  • दिएगो ज्युनिएर्स 1 (इव्हान लाझरस 36वे मिनिट) वि.वि. युपीएसए 0
  • डेक्कन सी 1 (हर्षल दिक्षीत 15वे मिनिट) बरोबरी वि. सनी डेज 1 (विनायक अनमोल 60वे मिनिट)
  • एफसी बेकडिन्हो 2 (मोहन पाटिल 3रे मिनिट, सौरभ पाटिल 53वे मिनिट) बरोबरी वि. एफसी जोसेफ (प्रविण नागरी 26, 34वे मिनिट)
  • गट ड डायनामाईटस 1 (सुरजद लाड 35वे मिनिट) वि.वि. खडकी ब्लूज 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.